रॉयल रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन

बातमी शेअर करा...

रॉयल रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन

जळगाव / प्रतिनिधी – धनाजी नाना काळे नगर येथील रॉयल रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्सव उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव होण्यासाठी शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूपौर्णिमा म्हणजे केवळ शैक्षणिक गुरूंचा सन्मान नव्हे, तर आयुष्य घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त करण्याची संधी, या उद्देशाने शाळेने पालक पाद्यपूजन उपक्रम राबवला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे विधीवत पूजन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले. अनेक पालकांच्या डोळ्यांत या भावनिक क्षणांत पाणी आले होते.

कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा रीता ओमप्रकाश सिखवाल, संजय शर्मा, मीत सिखवाल, मन सिखवाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुरू आणि पालकांचे आयुष्यातील महत्त्व विशद करत त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, आदर आणि कृतज्ञतेच्या मूल्यांची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षकवर्ग आणि व्यवस्थापन समितीचे विशेष योगदान लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम