
रोझोदा येथे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
रोझोदा येथे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
सावदा :- रोझोदा येथे कवी राजेंद्र चौधरी यांचा दिवा तुळशीरामाचा या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी महामंडलेश्वर जर्नादन हरी जी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. राजेंद्र चौधरी यांचे अनेक स्वलिखित लेख, व कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत.
यावेळी त्यांचा स्वलिखीत दिवा तुळशीरामाचा कविता संग्रह तर ज्ञानधारा लेख संग्रह पुस्तक तसेच श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने कामसिध्द महाराजांची आख्यायिका पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न झाले.
दिवा तुळशीराम या कविता संग्रहाला कै. राम नेमाडे यांनी तर
ज्ञानधारा लेख संग्रहाला सावदा येथील व. पू. होले यांची प्रस्तावना लाभली आहे.
याप्रसंगी पाहुण्यांचा सत्कार राजेंद्र चौधरी यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले. डाँ. अतुल सरोदे. स्वाती शृंगारपूरे. आर. बी सोनवणे.विजय लुल्हे व राजेंद्र चौधरी यांनी आपापल्या कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी महामंडलेश्वर जर्नादनन हरीजी महाराज, महाराष्ट्राचे हास्य कवी अशोककाका नायगावकर, ह भ प भरत महाराज, ह भ प दुर्गादास महाराज, प्राध्यापक व. पु. होले, डॉक्टर अतुल सरोदे ,नरेंद्र नारखेडे, रोझोदा सरपंच पुष्कर फेगडे , सतपंथ मंदिर फैजपुर उत्तर अधिकारी एकदंत महाराज, रमेश महाजन, अध्यक्ष कामसिद्ध महाराज मंदिर विजय महाजन, डॉ.शशिकांत गाजरे, कृष्णा पाटील रावेर, पुरुषोत्तम धांडे , महेंद्र भारंबे, डॉ. मिलिंद वायकोळे ग्रामस्थ व पत्रकार मित्र उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील (सर),प्रास्ताविक व आभार राजेंद्र चौधरी यांनी केले.
श्री. चौधरी हे शिक्षक, पत्रकार, लेखक व कवी असून त्यांची पहिला अमृतवेल हा कविता संग्रह अशोक नायगांवकर यांच्या हस्ते २०१७ साली बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात प्रकाशित करण्यात आला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम