रोटरीत सर्वांगीण विकासाची संधी-शेवाळे

बातमी शेअर करा...
रोटरीत सर्वांगीण विकासाची संधी-शेवाळे
 रोटरी जळगाव स्टार्सचा पदग्रहण उत्साहात
     जळगाव – रोटरीमुळे जिद्द, ताकद, आत्मविश्वास मिळतो. त्यातून सर्वांगीण विकासाची संधी प्राप्त होते असे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे (नाशिक) यांनी प्रतिपादन केले.
        गणपती नगरातील रोटरी कम्युनिटी वेल्फेअर सेंटरच्या रोटरी हॉलमध्ये झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या सातव्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
     यावेळी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी इव्हेंट निलेश परतानी, सहप्रांतपाल सचिन जेठवाणी यांची विशेष उपस्थिती होती.
    रोटरीमुळे मैत्री होऊन शेअरिंग त्यातून  केअरिंगची भावना निर्माण होते. कुटुंबीयांशी नातं समृद्ध होऊन व्यावसायिक जबाबदारी प्रगती होते असे ज्ञानेश्वर शेवाळे यांनी भाषणात सांगितले.
        ते पुढे म्हणाले की, रोटरीत आल्यानंतर स्वतःची प्रतिमा तयार होते. रोटरी सेवा शिकवते. सेवेचा उद्देश असला तर साधनांच्या पंखा शिवाय भरारी घेता येते.
     निलेश परतानी यांनी दृढता व परोपकाराच्या भावनेने वंचितांच्या जीवनातील अंधकार नष्ट करीत सेवेचा प्रकाश पसरविण्याचे कार्य रोटरी जळगाव स्टार्सचे सदस्य करीत आहे असे सांगितले.
     नूतन अध्यक्ष विपुल पटेल यांना चिराग शाह यांनी तर सचिव हितेश सुराणा यांना सरिता झंवर यांनी पदभार दिला.
          चिराग शाह यांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. विपुल पटेल यांनी मनोगत व्यक्त करून कार्यकारणीची घोषणा केली.
      प्रांतपालांचा परिचय सचिन जेठवाणी यांनी तर सूत्रसंचालन सागर मुंदडा यांनी केले. आभार हर्षल देशमुख यांनी मानले.
      प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात येऊन, नूतन अध्यक्ष व सचिवांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
          सोहळ्यास माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील, डॉ.तुषार फिरके, महेंद्र रायसोनी, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा भट – कासार, संजय गांधी, जितेंद्र ढाके या मान्यवरांसह शहरातील विविध रोटरी व इनरव्हील क्लबचे अध्यक्ष – सचिव तसेच स्टार्सच्या सदस्यांची कुटुंबीयांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम