रोटरी इंटरनॅशनलचे संचालक सुब्रमण्यम शनिवारी जळगावात

बातमी शेअर करा...
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या शनिवार १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता पदग्रहण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे संचालक टी.एन. सुब्रमण्यम यांची उपस्थिती राहणार आहे.
    यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन व सहप्रांतपाल संजय गांधी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
       नूतन अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी हे या सोहळ्यात पदभार स्वीकारणार आहेत.
               पदग्रहणाच्या दिवशीच रोटरी भवन येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पब्लिक इमेज कमिटी चेअरमन मुनिरा तरवारी यांनी दिली.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम