
रोटरी क्लबतर्फे एनसीसी ऑफिसर्स, विद्यार्थ्यांचा गौरव
रोटरी क्लबतर्फे एनसीसी ऑफिसर्स, विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एनसीसी ऑफिसर्स व राष्ट्रीय पथ संचालनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारार्थी मध्ये एनसीसीचे सुभेदार रामकिशन, हवालदार राजू गायकवाड, वरिष्ठ लिपिक गौरव निमजे आणि राष्ट्रीय पथक संचालनात सहभागी झालेले एनसीसी कॅडेट गुणवंत खाडे, अरिफ पिंजारी, खुश बाविस्कर, उदय पाटील, साक्षी सिंग यांचा समावेश होता.
त्यानंतर रोटरी क्लब जळगावच्या सा रे ग म समूहाच्या कलावंतांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केले. निवेदन व संचालन सुबोध सराफ यांनी केले.
गायक कलावंतांमध्ये नित्यानंद पाटील, कॅप्टन मोहन कुलकर्णी, राजेश वेद, ॲड.आनंद मुजुमदार, सुबोध सराफ, स्मिता पाटील, विशाखा पोतदार, वृषाली जोशी, ॲड. कीर्ती पाटील, आदिती कुलकर्णी, खुश बाविस्कर यांचा समावेश होता.
प्रारंभी गणपती नगरातील रोटरी हॉल येथे माजी अध्यक्ष अशोक जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम