रोटरी क्लबतर्फे १२ शिक्षकांचा  नेशन बिल्डर अवॉर्डने गौरव 

बातमी शेअर करा...
रोटरी क्लबतर्फे १२ शिक्षकांचा  नेशन बिल्डर अवॉर्डने गौरव 
   जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे शिक्षक दिनानिमित्त माजी कुलगुरू के.बी. पाटील व जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते बारा शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने गौरव करण्यात आला.
       गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील, अनिल कांकरिया, संदीप काबरा, अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी डॉ. अपर्णा भट – कासार, उल्हास सुतार, वसुधा सराफ, माधुरी पुंडे, मुश्ताक अली व विशाल सोनकुल या विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाने इतरांना प्रशिक्षित करणारे तसेच स्मिता चव्हाण, हिम्मत काळे, एकनाथ पाचपांडे, जयश्री भंगाळे, मनीषा बागरेचा, आरती भंगाळे या शिक्षकांचा सत्कारार्थीं मध्ये समावेश होता.
     सत्कारार्थींच्यावतीने विशाल सोनकुल यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. क्लबच्या लिटरसी कमिटी चेअरमन प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी नेशन बिल्डर ॲवार्ड देण्यामागची भूमिका विशद केली.
      संवाद सचिव पंकज व्यवहारे यांनी शिक्षकांचा कार्यपरिचय करून दिला. सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले. विविध शाळांचे मुख्याध्यापक, रोटरी क्लब सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम