
रोटरी क्लबतर्फे १५ शाळांमध्ये ३ हजार वह्यांचे वितरण
रोटरी क्लबतर्फे १५ शाळांमध्ये ३ हजार वह्यांचे वितरण
जळगाव – रोटरी क्लब जळगावतर्फे शहर आणि परिसरातील १५ शाळांमधील ५०० गरजू विद्यार्थ्यांना एकूण ३ हजार वह्यांचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आला.
विशेष म्हणजे, इंटरॅक्ट क्लबचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने प्रत्येकी २५ गरजू विद्यार्थ्यांची निवड केली. त्यानंतर रोटरी क्लब सदस्यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. उपक्रमासाठी भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.
वितरणामध्ये अभिनव, शकुंतला, जिजामाता, ए. टी. झांबरे, भगीरथ, शारदा, बाहेती, या. दे. पाटील, श्रीराम, गुळवे, का. ऊ. कोल्हे, नंदिनीबाई, संत हरदासराम, आदर्श सिंधी विद्यालय, सुप्रीम कॉलनीतील महानगरपालिका शाळा क्र. ३२, असोदा सार्वजनिक विद्यालय आणि ममुराबाद नेहरू विद्यालयाचा समावेश होता.
कार्यक्रमास सुभाष अमळनेरकर, सुबोध सराफ, गिरीश कुलकर्णी, संदीप शर्मा, स्वाती ढाके, विजय जोशी, मनोज जोशी, रितेश जैन, चंदन महाजन, योगेश चौधरी, सुरेश केसवाणी, पंकज व्यवहारे आणि डॉ. शुभदा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
वह्या मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम