रोटरी क्लब जळगावच्या पुढाकाराने १२ गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

या वर्षात आतापर्यंत ११० शस्त्रक्रिया रोटरी क्लबच्या माध्यमातून

बातमी शेअर करा...

रोटरी क्लब जळगावच्या पुढाकाराने १२ गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

या वर्षात आतापर्यंत ११० शस्त्रक्रिया रोटरी क्लबच्या माध्यमातून

जळगाव (प्रतिनिधी) – समाजसेवेचा वसा जोपासत रोटरी क्लब जळगावतर्फे १२ गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. तुषार फिरके यांच्या विष्णुलीला हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

या उपक्रमाच्या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. सागर चित्रे आणि सुनील सोनार उपस्थित होते. रुग्णांना आवश्यक ती सर्व सुविधा मोफत पुरवण्यात आली.

रोटरी वर्ष २०२४-२५ मध्ये आतापर्यंत एकूण ११० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रोटरी क्लब जळगावच्या माध्यमातून करण्यात आल्या असून, या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांचे दृष्टिपथ पुन्हा उजळले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम