
रोटरी क्लब जळगाव तर्फे महिलांची कॅन्सरपूर्व तपासणी
जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम
जळगाव प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब जळगावच्या मेडिकल कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये महिलांसाठी कॅन्सरपूर्व अर्थात लाल एलईडीसह स्तन तपासणी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष ॲड. सागर चित्रे,मानद सचिव पराग अग्रवाल, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ.जयंत जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात २९ महिलांची प्रकल्प प्रमुख डॉ.माधुरी कासट, डॉ.साधना पाटील, डॉ.लीना बडगुजर यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी रितेश जैन, विश्वजीत बहाटे, प्रा.डॉ.शुभदा कुलकर्णी, सानिया चित्रे, सोनल अग्रवाल, प्रीती महाजन यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम