रोटरी क्लब जळगाव नॉर्थतर्फे मातोश्री आनंदाश्रमास उपयुक्त साहित्य भेट

बातमी शेअर करा...

रोटरी क्लब जळगाव नॉर्थतर्फे मातोश्री आनंदाश्रमास उपयुक्त साहित्य भेट

जळगाव प्रतिनिधी दिवाळी सणाचे औचित्य साधत रोटरी क्लब जळगाव नॉर्थ व सौ प्रिया व कुणाल चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रमास कपाट, साईड स्टॅन्ड म्हणून वापर येतील असे टेबल या उपयुक्त साहित्याची भेट देण्यात आली. या साहित्यामुळे आनंदाश्रमातील आवश्यक बाबी साठवून ठेवणे तसेच टेबल वर औषोधोपचार साहित्य नीटनेटके ठेवण्यास सहाय्य होणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब जळगाव नॉर्थ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाना शेवाळे, डॉ राजेश पाटील, सचिन जेटवानी, अध्यक्ष बिपीन पाटील, सचिव हितेंद्र धांडे, भरत कर्डीले, चंदन कोल्हे, विपुल पाटील, कश्मीरा जैन, चेतन पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, प्रशांत अग्रवाल, रुपेश सरोदे, जयेश बहिराम आदी उपस्थित होते. याप्रसंगी मातोश्री आनंदाश्रमाने भेट स्वीकारून आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम