
रोटरी जळगाव इलाईट तर्फे वह्याचे वितरण, वृक्षारोपण
रोटरी जळगाव इलाईट तर्फे वह्याचे वितरण, वृक्षारोपण
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट आणि सुदर्शन पेपर मिल यांच्या संयुक्त विद्यमाने सुनसगाव मधील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांना तीन हजार वह्यांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी इलाईटचे अध्यक्ष संदीप झंवर, संस्थाध्यक्ष रमेश डी.पाटील, रोटरी इलाईटचे सदस्य व सुदर्शन पेपर मिलचे संचालक राजीव चौधरी, बिना चौधरी, अजित महाजन, नितीन इंगळे, चारुशीला इंगळे, श्रीराम परदेशी, संजय लाठी, मीत मेहता, दर्शन भय्या, मुख्याध्यापक जे.पी. सपकाळे, कार्यक्रम समन्वयक के.डी.तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम