
रोटरी जळगाव परिवाराची आगामी उपक्रमाबद्दल चर्चा
मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन
जळगाव – येथील रोटरी जळगाव परिवाराच्या झालेल्या बैठकीत लहान मुलांमध्ये येणारा लठ्ठपणा (ओबेसिटी) व माझे शहर माझे जबाबदारी या आगामी उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.
मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये आयोजित बैठकीत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे डॉ.जुगल चिरानिया (अकोला),डॉ.राजेश पाटील, प्रेसिडेंट एन्क्लेव्ह किशोर सूर्यवंशी, सेक्रेटरी एन्क्लेव्ह डॉ.पंकज शाह या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अपघात झालेल्या गोमातांना उपचार व रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहनाची उपलब्धता याविषयी देखील विचार विनिमय करण्यात आला.
चर्चेत सहप्रांतपाल जितेंद्र ढाके,कॅप्टन मोहन कुलकर्णी, दिलीप गांधी ,ॲड.सुरज जहांगीर, योगेश भोळे, सुनील सुखवानी, डॉ. सुनील सूर्यवंशी, अजित महाजन, सचिन जेठवाणी, अध्यक्ष छाया पाटील, तुषार जाखेटे, वर्षा रंगलानी, विनीत जोशी, दिनेश थोरात, चिराग शाह, मानद सचिव पराग अग्रवाल, तुषार तोतला, गौरव सफळे, जितेंद्र बरडे, डॉ. नीरज अग्रवाल, महेश सोनी,प्रदीप झंवर यांनी सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम