रोटरी जळगाव मिडटाऊनच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे घेतले शैक्षणिक दृष्ट्या पालकत्व 

बातमी शेअर करा...
रोटरी जळगाव मिडटाऊनच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे घेतले शैक्षणिक दृष्ट्या पालकत्व 
  जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या सदस्यांनी करंज येथील रामनाथ बाबा प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेत त्यांचे पालकत्व स्वीकारले.विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण देखील करण्यात आले.
अध्यक्ष ॲड. किशोर बी. पाटील, मानद सचिव डी.ओ.चौधरी, प्रकल्प समन्वयक छाया पाटील यांच्या नेतृत्वात दिनेश कक्कड, दिलीप गांधी, डॉ.अपर्णा मकासरे, डॉ. किरण सुपे, माधवी असावा यांनी पहिली ते दहावीपर्यंतची विद्यार्थ्यांची फी भरून पालकत्व स्वीकारले.शैक्षणिक साहित्यासाठी सुरेखा शिरुडे, सुधीर चौधरी, प्रा. यशवंत सैंदाणे, डी. ओ.चौधरी, छाया पाटील यांनी आर्थिक योगदान दिले असे पब्लिक इमेज कमिटी चेअरमन डॉ. उषा शर्मा यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम