रोटरी जळगाव वेस्टच्या चैत्र चांदणं मैफिलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद

गायक कलावंतांनी केले विविध गीतांचे सादरीकरण

बातमी शेअर करा...

रोटरी जळगाव वेस्टच्या चैत्र चांदणं मैफिलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद

गायक कलावंतांनी केले विविध गीतांचे सादरीकरण

जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रविवारी सायंकाळी महाबळ रोडवरील भाऊंचे उद्यान येथे चैत्र चांदणं या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प सचिव तुषार तोतला, प्रोजेक्ट हेड डॉ.सुशीलकुमार राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मैफिलीत किरण सोहळे, श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी या गायक कलावंतांनी सादरीकरण केले .

प्रारंभी जयोस्तुते गणपती ही गणेश वंदना व श्रुती जोशी यांनी कवयित्री शांता शेळके यांची रचना असलेले जय शारदे वागेश्वरी हे गीत सादर केले. समूह स्वरात सादर केलेल्या अभंगमाला व हरी म्हणा तुम्ही या गीतांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते.

चला अयोध्या जाऊ हे किरण सोहळे रचित व गणेश देसले यांनी संगीतबद्ध केलेले गीत सादर करण्यात आले. ऐश्वर्या परदेशी यांनी राम राम जप करी सदा तर श्रुती जोशी यांनी आज अयोध्या सजली हे गीत सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.

म्यानातून उसळे या देशभक्तीपर गीतानंतर ऐश्वर्या परदेशी यांनी सलोना सा सजन है तर किरण सोहळे व श्रुती जोशी यांनी शुक्रतारा या भावगीताने मैफिलीला रंगत आणली. विविध हिंदी चित्रपटातील यमन रागावर आधारित मेलडी स्वरूपातील अनेक गीतांनी व गोमू संगतीनं या गाण्याने कार्यक्रमाची नवी उंची गाठली. बाजे मुरलीया या भारतरत्न लता मंगेशकर व भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या गीताने व भैरवीने चैत्र चांदणं या मैफिलीचा समारोप करण्यात आला.

गणेश देसले (हार्मोनियम), सुयोग गुरव (तबला), गौरव काळंगे (की बोर्ड), दर्शन गुजराथी (पखवाज) यांनी साथ संगत केली. आर्जवी नादमय शब्दांनी सजलेला हा संगीत अविष्कार अनुभवण्यासाठी जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम