रोटरी जळगाव वेस्टतर्फे आयतं, पोयतं सख्यान

रंगपंचमी निमित्त कलावंत प्रवीण माळी यांचा कार्यक्रम

बातमी शेअर करा...

रोटरी जळगाव वेस्टतर्फे आयतं, पोयतं सख्यान
रंगपंचमी निमित्त कलावंत प्रवीण माळी यांचा कार्यक्रम
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रंगपंचमी निमित्त कलावंत प्रवीण माळी(शिरपूर) यांच्या आयतं, पोयतं सख्यान या बोलीभाषेतील मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वामीनारायण मंदिराजवळील डॉ. पंकज पाटील यांच्या फार्म हाऊस येथे उधळू या रंग हास्याचे….या कार्यक्रमात माळी यांनी नव्या पिढीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी पोटदुखेपर्यंत हसवत पण डोळे उघडणारे प्रबोधनपर संदेश उपस्थितांपर्यंत आपल्या कलेद्वारे पोहोचवले.
प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे पण बोलीभाषा टिकून राहणं देखील तितकच आवश्यक आहे आणि ही पालकांची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला बोलीभाषा शिकवली गेली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प सचिव तुषार तोतला, प्रकल्प प्रमुख विजय शामनानी, देवेश कोठारी यांच्यासह रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांची परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम