रोटरी जळगाव वेस्टतर्फे रविवारी चैत्र चांदणं कार्यक्रम

जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

रोटरी जळगाव वेस्टतर्फे रविवारी चैत्र चांदणं कार्यक्रम

जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन

जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे युफोरिया यांच्या सहकार्याने रविवार ३० रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाबळ रोडवरील भाऊंचे उद्यान येथे चैत्र चांदणं या ऑफबीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष विनीत जोशी व प्रोजेक्ट हेड डॉ.सुशीलकुमार राणे यांनी कळविले आहे.
किरण सोहळे, श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी हे गायक कार्यक्रमात सादरीकरण करणार असून गणेश देसले (हार्मोनियम), सुयोग गुरव (तबला), गौरव काळंगे (की बोर्ड), दर्शन गुजराथी (पखवाज) हे साथ संगत करणार आहेत.
आर्जवी नादमय शब्दांनी सजलेला हा संगीत अविष्कार अनुभवण्यासाठी जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे प्रशासकीय सचिव भद्रेश शाह व प्रकल्प सचिव तुषार तोतला यांनी आवाहन केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम