
रोटरी जळगाव सेंट्रलच्या कार्यक्रमात दक्षिणात्य पाककला नृत्याचा संगम
रोटरी जळगाव सेंट्रलच्या कार्यक्रमात दक्षिणात्य पाककला नृत्याचा संगम
जळगाव प्रतिनिधि
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे आयोजित कार्यक्रमात दक्षिणात्य पाककला आणि नृत्याचा संगम सदस्यांना अनुभवता आला.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी सेंट्रलच्या परिवारातील महिलांनी विविध दक्षिणात्य खाद्यपदार्थ सादर केले होते.
त्यात सोनल व रेखा अग्रवाल (इडली), मीना लुणीया (सांबार, चटणी) वैशाली जैन (कर्ड राईस), किरण राठी (हैदराबादी बिर्याणी), नीता जैन ( कोल्ड कॉफी ), जोत्स्ना रायसोनी (मेदु वडा), कविता अग्रवाल (पायनापल शिरा), शितल कासट (मैसूर पाक), विणा कांकरिया (कैरी पन्हे) ,ममता मुथा (मुखवास) यांचा सहभाग होता.
डॉ.नरेंद्र जैन, डॉ. राजेश जैन, पंकज कासट यांनी साउथ इंडियन गीतावर नृत्य सादर केले. डॉ. राजेश जैन यांनी दोन गाणी सादर केली.
महिला समितीच्या माजी प्रमुख नीता जैन यांचा कार्यक्रमाचे नियोजन व संचालनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलच्या सदस्यांची परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम