रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे कापडी पिशव्यांचे वितरण

नो प्लास्टिक विषयी अभियान

बातमी शेअर करा...

रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे कापडी पिशव्यांचे वितरण

नो प्लास्टिक विषयी अभियान

जळगाव प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे काव्यरत्नावली चौकात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजिंदरसिंग खुराणा यांच्या हस्ते व माजी अध्यक्ष जतिन ओझा, माजी सचिव सुरेश जैन (कांकरिया) यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी नो प्लास्टिक अभियानाची संदेश फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्रारंभी दिनेश थोरात यांनी कार्यक्रमाविषयी भूमिका मांडली. यावेळी मानद सचिव समर्थसिंग पाटील,माजी अध्यक्ष महेंद्र रायसोनी, डॉ. अंजुम अमरेलीवाला, माजी सचिव जितेंद्र अग्रवाल व रमेश ललवाणी, संदीप मुथा,साधना दामले, भरत कपूर, गौरव मेहता, माधुरी थोरात या मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम