रोटरी जळगाव स्टार्सच्या अध्यक्षपदी विपुल पटेल, सचिवपदी हितेश सुराणा

बातमी शेअर करा...
रोटरी जळगाव स्टार्सच्या अध्यक्षपदी विपुल पटेल, सचिवपदी हितेश सुराणा
  जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्या अध्यक्षपदी विपुल पटेल यांची तर मानद सचिवपदी हितेश सुराणा यांची निवड झाली असून नूतन पदाधिकारी सोमवार २१ रोजी रात्री आठ वाजता गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात पदभार स्वीकारणार आहेत.
       रोटरी वर्ष २०२५ – २६ च्या नूतन कार्यकारणीमध्ये आयपीपी चिराग शाह, कोषाध्यक्ष निमित कोठारी, सार्जंट ॲट आर्म्स करण ललवाणी यांच्यासह माजी अध्यक्ष सागर मुंदडा, धनराज कासट, पुनीत रावलानी, सचिन बलदवा, सरिता झंवर, रोहित आहुजा, दिलीप रंगलानी, मृणालिनी चित्ते, हर्षल राजपूत, जिगर पटेल, योगेश सांखला, राहुल कुकरेजा, निशीत हासवानी, अनमोल मलिक यांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम