
रोटरी जळगाव स्टार्सतर्फे रोटरी कार्यगौरव पुरस्कार
रोटरी जळगाव स्टार्सतर्फे रोटरी कार्यगौरव पुरस्कार
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे स्व. डॉ. प्रताप जाधव यांच्या स्मरणार्थ रोटरी कार्य गौरव आणि सेवा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
गणपती नगरातील भैय्यासाहेब नथमल लुंकड सभागृहात प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी निलेश परतानी, माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, सुनिता जाधव, डॉ. राजेश पाटील, संजय शाह यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
रोहित सिंघवी (अमळनेर), गजानन ठाकूर (भुसावळ), सोनू मांडे (भुसावळ), विलास पाटील (चोपडा), सुयोग जैन (पाचोरा) या पुरस्कारांच्या मानकरींचा स्मृतिचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनचे राजू मुंदडा यांचा रोटरी सेवा पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला. त्यांचा कार्य परिचय योगेश सांखला यांनी करून दिला. रोटरी जळगाव स्टार्सचे निकुंज अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन सागर मुंदडा यांनी केले.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विपुल पटेल, मानद सचिव हितेश सुराणा, सहप्रांतपाल सचिन जेठवाणी, चिराग शाह, सरिता झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम