
रोटरी मिडटाऊनतर्फे वृद्धाश्रमास वर्धापन दिनी भोजन टिफीन भेट
रोटरी क्लब ऑफ जळगांव मिडटाऊन ४० व्या वर्षांत पदार्पण
रोटरी मिडटाऊनतर्फे वृद्धाश्रमास वर्धापन दिनी भोजन टिफीन भेट
रोटरी क्लब ऑफ जळगांव मिडटाऊन ४० व्या वर्षांत पदार्पण
जळगाव प्रतिनिधि
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शहरातील मातोश्री आनंदाश्रमातील आजी आजोबांसाठी पन्नास स्टीलचे टिफीन भेट व एक दिवसाचे भोजन देऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
वितरण प्रसंगी अध्यक्ष छाया पाटील , माजी अध्यक्ष दिलीप गांधी, डॉ.उषा शर्मा , दिनेश कक्कड, शंकर पटेल , सुनंदा देशमुख , श्रीकांत वाणी , लक्ष्मी पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
७ एप्रिल १९८६ रोजी रोटरी क्लब ऑफ जळगांव मिडटाऊनची स्थापना करण्यात आली.क्लबला ३९ वर्ष पूर्ण होऊन ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
रोटरी मिडटाऊनतर्फे डोळ्यांचे ऑपरेशन, शैक्षणिक साहित्य वितरण, गरीब गरजू महिलांना रोजगार उपलब्धतेसाठी शिलाई मशीन वितरण, आरोग्य तपासणी, असे प्रकल्प वर्षभर राबविण्यात आले.
या उपक्रमासाठी हेमंत पाटील , डॉ.अपर्णा मकासरे , दिनेश कक्कड यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम