
रोटरी वाचन कट्ट्याची व.वा.वाचनालयात सुरवात
रोटरी वाचन कट्ट्याची व.वा.वाचनालयात सुरवात
जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव व व. वा. जिल्हा वाचनालयाच्यावतीने रोटरी वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी अश्नि उमाळे, अनघा व्यवहारे, प्रदीप रस्से, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, कार्याध्यक्ष अनिल शाह यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
वाचन कट्ट्यावर अश्नि उमाळे हिने नॉट विदाऊट माय डॉटर या आत्मकथनात्मक पुस्तकातील अमेरिकन महिला बेट्टी आणि तिची मुलगी महताब यांच्या संघर्ष कहाणीबद्दल सांगितले.
अनघा व्यवहारे हिने टाईम स्टॉप एट शामली या लघुकथा
संग्रहाबद्दल सांगितले. निसर्ग, हिरवळ आणि शामली या गावाचे सौंदर्य, गावातील ओळखी, त्यांच्या भाव-भावना व शांत वातावरण आवडल्याचे सांगितले.
प्रदीप रस्से यांनी ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर अर्थात तात्यांचा आपल्या जीवनावरील प्रभावाबद्दल सांगितले. माझ्यातील लेखक, कलाकार त्यांनी घडविला. त्यांची लेखन वैशिष्ट्ये सांगताना सत्तांतर या कादंबरीतील माकडांच्या वर्चस्वाच्या लढाईबद्दल सांगितले.
प्रारंभी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी रोटरी वाचन कट्टा सुरु करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. व. वा. जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल शाह यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनालय सोबत असल्याचे सांगितले.
अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी समाजातील सर्व घटकांनी वाचन कट्टारुपी प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव पंकज व्यवहारे, प्रा. राजेंद्र देशमुख, चंद्रकांत भंडारी, डॉ. प्रीती पाटील, स्वाती ढाके, प्रणिता झांबरे यांच्यासह अनेक मान्यवर वाचक रसिकांची उपस्थिती होती.
—————————————————————

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम