
रोटरी वेस्टचा आगळावेगळा पाच शिक्षकांचा सन्मान सोहळा
रोटरी वेस्टचा आगळावेगळा पाच शिक्षकांचा सन्मान सोहळा
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने पारंपारिक पद्धतीने शिक्षक दिन न करता विविध क्षेत्रात विद्यार्थी – शिष्य घडविणाऱ्या पाच गुरूंचा शिक्षक दिनानिमित्त आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या या सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून व अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी, लिटरसी कमिटी चेअरमन प्रा. डॉ. चेतन महाजन, विकली मीटिंग कमिटी चेअरमन सरिता खाचणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सोहळ्यात शारदा वेद पाठशाळेचे आचार्य अशोक साखरे गुरुजी, नाट्यकर्मी चिंतामण पाटील, राष्ट्र सेविका समितीच्या विंदा नाईक, गायक व संगीतकार दुष्यंत जोशी आणि योगाचार्य देवानंद सोनार यांना सन्मानपत्र शाल प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी डॉ.राजेश पाटील यांनी मार्गदर्शन तर सर्व सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. सत्कारार्थींच्या कार्याची माहिती प्रा. राजेंद्र देशमुख, डॉ. विजय शास्त्री, गरिमा राका, वैशाली कोठारी, प्रा. डॉ. चेतन महाजन यांनी करून दिली. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. या कार्यक्रमात सायक्लोथॉन, वॉकेथॉन यशस्वी करणाऱ्या रोटरी वेस्ट व रोटरॉक्ट वेस्टच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम