रोटरी वेस्टच्या स्वातंत्र्य रथयात्रेमुळे  शहरात देशभक्तीमय वातावरण 

बातमी शेअर करा...
रोटरी वेस्टच्या स्वातंत्र्य रथयात्रेमुळे  शहरात देशभक्तीमय वातावरण 
          जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे  स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य रथयात्रेचा शुभारंभ उद्योजक विदुर मेहता यांच्या हस्ते करण्यात आला.
                 नंतर स्वातंत्र्य रथयात्रेचा  भाऊंचे उद्यान येथून प्रारंभ होऊन सायंकाळी ५ वाजता  काव्यरत्नावली चौक येथे समारोप झाला.
         शहरातील विविध प्रमुख चौकात या रथयात्रेद्वारे सादर केलेल्या गीतांमुळे देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रोटरी – आयएफआरएमच्या सदस्यांनी देखील गीते सादर केली.  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .
       कार्यक्रमास अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी, प्रकल्प प्रमुख सुनील सुखवाणी यांच्यासह माजी अध्यक्ष डॉ.अरुण बगडिया, नितीन रेदासनी, रमण जाजू, विनोद बियाणी, योगेश भोळे, डॉ.सुशीलकुमार राणे, सरिता खाचणे, विनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
              यशस्वीतेसाठी तुषार  तोतला, योगेश भोळे, विजय श्यामनानी, सचिन वर्मा, शंतनु अग्रवाल यांच्यासह रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
       मायादेवी नगरातील रोटरी भवनच्या मैदानात माजी प्रांतपाल रमेश मेहेर (नाशिक) यांच्या हस्ते व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम