
रोटरी वेस्टने ग्रामीण विद्यार्थ्यांना… घडविली अंतरिक्षाची सफर !
चला अंतरिक्षात जाऊ संकल्पना
रोटरी वेस्टने ग्रामीण विद्यार्थ्यांना… घडविली अंतरिक्षाची सफर !
चला अंतरिक्षात जाऊ संकल्पना
जळगाव – रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने शैक्षणिक विकासासाठी दत्तक घेतलेल्या टाकरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ग्रामीण विद्यार्थ्यांना चला अंतरिक्षात जाऊ या ही अनोखी सफर घडवली.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना अवकाशाची ओळख करून दिली.
त्यांनी दुर्बिणीद्वारे आकाशातील विविध तारे व ग्रह दाखवले. प्रत्यक्ष एवढ्या लांब असणारे व आतापर्यंत फक्त ऐकलेले तारे व ग्रह प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रचंड आनंद झाला. प्रत्यक्ष अंतरिक्षात गेल्याचा भास झाल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेल्या रोटरी वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रा.चेतन महाजन, नेहा जोशी यांच्या हस्ते बौद्धिक खेळाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले.
यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी देसले, ज्योती पाटील, भरत सूर्यवंशी, गणेश महाजन, नागेश इंगोले यांचे मार्गदर्शन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम