रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी  जितेंद्र बरडे, सचिव ॲड. केतन ढाके

बातमी शेअर करा...
रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी  जितेंद्र बरडे, सचिव ॲड. केतन ढाके
 रविवारी पदग्रहण – नूतन कार्यकारणी घोषित 
 जळगाव – रोटरी वर्ष २०२५-२६ करिता रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी जितेंद्र बरडे आणि मानद सचिवपदी ॲड.केतन ढाके यांची निवड झाली आहे.
 गणपती नगरातील रोटरी हॉल मध्ये रविवार २७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या सोहळ्यात ते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या माजी प्रांतपाल मंजू फडके यांची प्रमुख अतिथी म्हणून तर सहप्रांतपाल सचिन जेठवाणी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 नूतन कार्यकारणी घोषित 
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलची नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून त्यात कोषाध्यक्ष दीपक नाथानी, आयपीपी दिनेश थोरात, सार्जंट ॲट आर्म्स विनोद बलदवा तर संचालक म्हणून डॉ.नरेंद्र जैन, महेंद्र रायसोनी, सी.ए.अनिल शाह, श्यामकांत वाणी, ॲड. श्रीओम अग्रवाल, शिरीष भिरुड, विष्णू भंगाळे, डॉ. राहुल मयूर, डॉ. अपर्णा भट – कासार, विपुल पारेख, मिलन मेहता, कल्पेश दोशी, डॉ. राजेश जैन, कल्पेश शाह, रवींद्र वाणी, महेंद्र गांधी, डॉ. प्रीती पाटील, श्यामलाल कुकरेजा
यांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम