
रोटरी सेंट्रल, एस.डी.फाउंडेशनच्या इंग्लिश प्रोफेशनरी कोर्सचा समारोप
रोटरी सेंट्रल, एस.डी.फाउंडेशनच्या इंग्लिश प्रोफेशनरी कोर्सचा समारोप
वंचित विद्यार्थ्यांना मिळाला आत्मविश्वास
जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि एस.डी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने विविध शाळांमधील ४० आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांच्या इंग्लिश प्रोफेशनरी कोर्सचे मोफत आयोजन करण्यात आले होते.
या कोर्सच्या समारोप सोहळ्यास वेव्हज क्लासेसचे संचालक प्रा ॲड. अभय कुलकर्णी , लँग्वटेकचे संचालक
डॉ. दीपक पाटील, अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जगात सर्वाधिक ८० देशात बोलली जाणारी भाषा म्हणून इंग्रजी भाषा मानली जाते. मातृभाषेत बोलणाऱ्यांपेक्षा इंग्रजी भाषेत बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वंचित, आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिवारातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी सेंट्रल व एस.डी.फाउंडेशनच्या या मोफत कोर्समुळे मिळालेला आत्मविश्वास पाहून त्यांचे करिअर उज्वल होईल असा विश्वास ॲड. अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
त्यांनी प्रशिक्षक डॉ. दीपक पाटील यांनी परिश्रमातून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून व्याकरण, अचूकता यावर लक्ष केंद्रित करून सरावात सातत्य राखा. योग्य वयात तुम्हाला भाषा शिकण्याची संधी मिळाली आहे त्याचे सोने करावे असे आवाहन केले.
डॉ. दीपक पाटील यांनी कोर्स मधील प्रशिक्षणाची उपस्थितांसमोर विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घेतली. पियुष मालुसरे, आर्या पाटील, संपदा पोतदार, हर्षल जगदाळे, मनीषा चौधरी, संजीवनी सोनवणे, पूर्वा पोतदार या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून प्रभावीपणे आत्मविश्वासाने सादरीकरण केले.
प्रास्ताविकात दिनेश थोरात यांनी या कोर्ससाठी एस.डी.फाउंडेशनने ८० टक्के तर रोटरी सेंट्रलच्या सदस्यांनी वैयक्तिक आर्थिक योगदान दिले असून डॉ. दीपक पाटील यांनी शुल्कात सूट देऊन योगदान दिले आहे असे सांगितले. आभार समर्थसिंग पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे कोषाध्यक्ष ॲड. केतन ढाके, महेंद्र गांधी, साधना दामले, साधना गांधी, माधुरी थोरात, नयना पाटील या मान्यवरांसह पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम