रोटरी सेवा सप्ताहात जळगाव सेंट्रलने उपक्रमांचा उच्चांक गाठला – डॉ.फिरके

रोटरी सेंट्रलच्या सदस्यांच्या कृतज्ञता सोहळा

बातमी शेअर करा...

रोटरी सेवा सप्ताहात जळगाव सेंट्रलने उपक्रमांचा उच्चांक गाठला – डॉ.फिरके

रोटरी सेंट्रलच्या सदस्यांच्या कृतज्ञता सोहळा

जळगाव प्रतिनिधी

रोटरीच्या १२१ व्या स्थापना दिनानिमित्त सेवा सप्ताहात रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने समाजपयोगी विविध कार्यक्रम व उपक्रमांचा उच्चांक गाठला असे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या रोटरी वीक सेलिब्रेशन कमिटी चेअरमन डॉ. तुषार फिरके यांनी प्रतिपादन केले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजिंदरसिंग खुराणा यांनी केलेल्या आवाहनानुसार डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सेक्रेटरी विरेंद्र पाथरीकर यांच्या मार्गदर्शनात रोटरी जळगाव सेंट्रलने सप्ताहात राबविलेल्या उपक्रमातील विविध संस्था आणि सक्रिय योगदान देणाऱ्या रोटरी सेंट्रलच्या सदस्यांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी सह प्रांतपाल जितेंद्र ढाके, प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन किशोर सूर्यवंशी, अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी सेवा सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी जळगाव सेंट्रल या क्लबने सर्वाधिक उपक्रमांसह विविध २० संस्थांसोबत आयोजन करीत साडेपाच ते सहा हजार व्यक्तींपर्यंत जनसंपर्क करून रोटरीची जनमानसात प्रतिमा उंचावण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे, असे डॉ.फिरके म्हणाले. सहप्रांतपाल जितेंद्र ढाके यांनी रोटरी सेंट्रलने या सप्ताहाचे सर्वात प्रथम पूर्व व पूर्ण नियोजन केले होते, असे सांगून केलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात सर्व सदस्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे असे सांगितले.

मदत करणाऱ्यांविषयी ऋण व्यक्त करणे ही आपली परंपरा आहे आणि रोटरी सेंट्रलने कृतज्ञता सोहळ्याद्वारे ती जोपासली आहे. प्रेसिडेंट एनक्लेव्हच्या सर्व मीटिंग व उपक्रमात रोटरी जळगाव सेंट्रल नेहमी अग्रेसर व सक्रिय असणारा क्लब आहे असे प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन किशोर सूर्यवंशी यांनी प्रतिपादन केले.
सोहळ्यात सप्ताहात सहकार्य करणाऱ्या विविध २० संस्था व सक्रिय योगदान देणाऱ्या रोटरी सेंट्रलच्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम