रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे सेवा सप्ताहामध्ये मानसिक स्वास्थ, कॅन्सर जागृतीविषयी व्याख्यान

रोटरी इंटरनॅशनलच्या स्थापना दिनानिमित्त उपक्रम

बातमी शेअर करा...

रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे सेवा सप्ताहामध्ये मानसिक स्वास्थ, कॅन्सर जागृतीविषयी व्याख्यान
रोटरी इंटरनॅशनलच्या स्थापना दिनानिमित्त उपक्रम

जळगाव
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे सेवा सप्ताह निमित्त मानसिक स्वास्थ्य, चांगला आणि वाईट स्पर्श व कॅन्सर जनजागृती या विषयांवर विविध शाळांमध्ये तीन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजिंदरसिंग खुराणा यांनी केलेल्या आवाहनानुसार रोटरी इंटरनॅशनलच्या स्थापना दिनानिमित्त या सेवा सप्ताहात रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात प.न.लुंकड कन्या शाळेच्या परिसरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या जयमंगलाबाई कुलकर्णी प्राथमिक विद्यालयात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या माजी सचिव डॉ. वैजयंती पाध्ये यांनी चांगला आणि वाईट स्पर्श याविषयी प्रत्यक्ष हातात बाहुली घेऊन लहान ४५० विद्यार्थिनींना हसत खेळत सोप्या पद्धतीने संवाद करीत मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा चंद्रात्रे, मिहीर बाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिन नेमाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेच्या वंदना अटवाल, कल्पना पवार, विद्या पाटील, प्रियांका खेडेकर, अर्चना निकम यांनी परिश्रम घेतले.
धुळे रोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मानसिक स्वास्थ (मेंटल हेल्थ) याविषयी डॉ.शरद सावळकर यांनी १५०० विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी अध्यक्ष दिनेश थोरात, कोषाध्यक्ष ॲड. केतन ढाके, प्राचार्य गोकुळ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालयातील विद्यार्थिनींना कॅन्सरतज्ञ डॉ. श्रद्धा चांडक यांनी कॅन्सरची कारणे, लक्षणे, घ्यावयाची काळजी याविषयी संवाद करीत मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष दिनेश थोरात, माजी अध्यक्ष डॉ. अपर्णा भट – कासार, उद्यमी महिला पतसंस्थेच्या संचालिका ॲड. उज्वला कुलकर्णी, प्राचार्य चारुलता पाटील, पर्यवेक्षिका एस.एम.राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्र संचालन नयना चौधरी यांनी तर परिचय जोत्स्ना भंगाळे यांनी करून दिला. आभार कांचन सावदेकर यांनी मानले.
यशस्वीतेसाठी शाळेतील बी.एस.राणे, जे.आर.भंगाळे, व्ही.पी.बैसाणे, एच.डी.नेमाडे यांच्यासह सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम