
रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम
उत्साही राहत असाल तर ही सुदृढ आरोग्याची लक्षणे
रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम
उत्साही राहत असाल तर ही सुदृढ आरोग्याची लक्षणे
जळगाव प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे सेवा सप्ताह निमित्त रामानंद नगर मधील ज्येष्ठ नागरिक मंडळात आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयुर्वेदाचार्य वैद्य श्रीरंग छापेकर, रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष व माजी सह प्रांतपाल शिरीष भिरुड, अध्यक्ष दिनेश थोरात, अटेंडन्स कमिटी चेअरमन श्यामलाल कुकरेजा तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव बाविस्कर, उपाध्यक्ष अवचित पाटील, सचिव मधुकर पवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ. श्रीरंग छापेकर यांनी चांगली भूक लागणे, खाल्ल्याला अन्नाचे पचन होणे , पोट साफ होणे, मूत्रविसर्जन, शरीर हलके होणे, उत्तम मानसिक स्थिती, पंचन्द्रयाचे उत्तम कार्य, गाढ झोप लागणे आणि वेळेवर जाग येणे, उत्साही राहत असाल तर ही सुदृढ आरोग्याची लक्षणे असल्याचे सांगितले.
हृदयविकार, स्ट्रोक , किडनी विकार, ब्लड प्रेशर, मधुमेह हे आजार आपण आपले मानसिक स्वास्थ समतोल ठेवले तर रोखू शकतो. आपला आहार महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले.
शरीराला एका ठिकाणी बसवून ठेवू नका, बागकाम करा, फिरायला जा, गप्पा मारा, चालत राहा, मनावर संयम ठेवा, असे सल्लेही वैद्य छापेकर यांनी दिले.
रोटरीच्या कार्याची शिरीष भिरूड यांनी तर दिनेश थोरात यांनी सेवा सप्ताहाची माहिती दिली. आभार श्यामलाल कुकरेजा यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम