रोहित शर्माच्या षटकारांच्या पावसाने आफ्रिदीचा विक्रम मोडला !

बातमी शेअर करा...

रोहित शर्माच्या षटकारांच्या पावसाने आफ्रिदीचा विक्रम मोडला !

रांची (प्रतिनिधी) – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं रांचीतील वनडे सामन्यात पुन्हा एकदा आपली स्फोटक खेळी सादर करत क्रिकेटविश्वाला थक्क केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात रोहितनं पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीचा जागतिक विक्रम मोडत वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा नवा इतिहास रचला.

रोहितच्या बॅटमधून उडालेल्या ३ षटकारांमुळे त्याने आफ्रिदीचे ३५२ षटकार मागे टाकत ३५२+ षटकारांसह ‘सिक्सर किंग’ हा किताब मिळवला. या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ३३१ षटकारांसह तिसरा तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी २२९ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

रोहितनं या सामन्यात आपले ६० वे वनडे अर्धशतक झळकावले. ५१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकार ठोकत त्यानं भारतीय डावाला मजबुती दिली. मार्को यान्सेनच्या चेंडूवर पायचित होऊन तो बाद झाला, तरी त्याची ही विक्रमी खेळी सामन्याचं मुख्य आकर्षण ठरली.

यशस्वी जैस्वाल २५ धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला आणि रोहितसोबत सामन्याचा वेगच बदलला. या दोघांनी १०९ चेंडूत १३६ धावांची तिसऱ्या विकेटसाठी धमाकेदार भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना अक्षरशः चक्रावून टाकले.

रोहितच्या विक्रमी षटकारांसह विराटसोबतची अभेद्य भागीदारी यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचे तज्ञांचे मत. भारतीय फलंदाजांची जागतिक स्तरावरील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम