लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

बातमी शेअर करा...

लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव : लग्नाचे अमिष दाखवित

२० वर्षीय तरुणीवर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरामधील हॉटेलमध्ये नेत अत्याचार करण्यात आला. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दि. १५ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सनी प्रमोद उमक (वय २४, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात राहणारी २० वर्षीय तरुणीची हरीविठ्ठल नगरमधील सनी उमक याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तरुणाने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर मात्र तरुणाने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. तरुणाकडून आश्वासन दिल्यानंतर देखील लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तरुणीने अखेर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून सनी उमक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम