
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून फसवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही सुरत येथे नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिची ओळख बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याच्याशी झाली होती. १८ मे रोजी दुपारी ४.३० ते ५.३० वाजेदरम्यान संशयिताने तिला जळगाव रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने १ जून रोजी रात्री ११.४२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम