
लग्नाला आलेल्या महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरी
लग्नाला आलेल्या महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरी
४ लाख ८२ हजारांचे दागिने लंपासः दहीगाव येथील घटना
यावल प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव गावात लग्न समारंभात आलेल्या २६ वर्षीय विवाहितेच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.१६ फेब्रुवारी रोजी घडली होती. तेव्हा याप्रकरणी सदर महिलेने कल्याण रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करीत तो यावल पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
दहिगाव ता. यावल या गावात जयश्री गणेश पाटील या महिला राहतात. त्यांच्याकडे एका विवाह समारंभात उपस्थिती देण्यासाठी उन्नती प्रकाश सूर्यवंशी (वय २६) रा. सरस्वती अनंतराज सोसायटी, बागशाला मैदान जवळ, डोंबिवली पश्चिम, जि.ठाणे या आल्या होत्या. दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री त्या जयश्री गणेश पाटील यांच्या घरी त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या व तिथेच त्यांची बॅग सुद्धा होती. त्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचा नेकलेस, राणीहार, सोन्याची पट्टी पोत असा एकूण ४ लाख ८२ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल तेथून चोरी करून नेला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सदर महिलेने कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आता तपासासाठी गुरुवारी यावल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम