
लमांजन येथील १९ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
लमांजन येथील १९ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील लमांजन येथे एका १९ वर्षीय तरुण विवाहितेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१४ जुलै) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत विवाहितेचे नाव अश्विनी गणेश पाटील (वय १९, रा. लमांजन, ता. जळगाव) असे असून ती पती व सासूसोबत राहात होती. पती गणेश पाटील हे मेरिको कंपनीत काम करत असून, अश्विनीचे माहेरही लमांजनमध्येच आहे. वडील सुधाकर पाटील हे शेती करतात.
सोमवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून घरी परतलेल्या सासूने दरवाजा बंद असल्याचे पाहिले. काही वेळ दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता अश्विनीने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी आवाज दिला असता शेजारील नागरिक मदतीला धावले. तात्काळ अश्विनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश आणि गावकऱ्यांचा शोक पाहून वातावरण भावनिक झाले होते. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम