
लाचलुचपत विरोधात जळगाव एसीबीचा पुढाकार नागरिकांसाठी कायमस्वरूपी तक्रार क्रमांक सुरू
लाचलुचपत विरोधात जळगाव एसीबीचा पुढाकार
नागरिकांसाठी कायमस्वरूपी तक्रार क्रमांक सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नवीन कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक सुरू केला आहे. हा क्रमांक थेट पोलिस उपअधीक्षकांकडे राहणार असून नागरिकांना व्हॉट्सअॅप किंवा थेट कॉलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
विभागाने जाहीर केलेला अधिकृत क्रमांक 7588661064 असा आहे. लाच मागणी, गैरव्यवहार किंवा कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती देण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे तक्रार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, गोपनीय आणि परिणामकारक होणार असून प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यात ही महत्त्वाची पावले ठरणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम