
लाच स्वीकारताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी अटकेत
भुसावळ: वॉरंटची बजावणी न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून या दोन्ही कर्मचाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीलाही लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईने जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण? एका वॉरंटची बजावणी न करण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) बाळू पाटील आणि हवालदार भालेराव यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीचा यशस्वी सापळा तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी लाचेची रक्कम स्वीकारताना बाळू पाटील आणि भालेराव यांच्यासह एका खाजगी पंटरलाही अटक करण्यात आली. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम