लाठी काठी शिक्षण शिबिर संपन्न

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

दहा दिवसापासून शहरात जळगाव जिल्हा मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे दि.25 एप्रिल ते 5 मे पर्यंत सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब आयोजित लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा संपन्न झाला.
त्याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्ष व रावेर नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्ष रियाताई पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एन.पी. पुराणिक, नलिनी पद्माकर महाजन, भाग्यश्री महाजन, कविता लोहार, डॉ. ऋतुजा कुलकर्णी, सरिता लोहार, भारती भूषण चौधरी, मनीषा सुजित शिरसाठ, गायत्री चौधरी, नलिनी भासलेराव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. दहा दिवसांमध्ये शिबिरात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थी्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेऊन आपल्या पालकांसोबत उपस्थित राहिल्या.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लाठीकाठी प्रशिक्षक युवराज माळी, भूषण चौधरी, अजय महाजन. प्रतीक खराले, जयेश बिरपन, देविदास चौधरी, विजय बारी, राम चौधरी, सरदार जी. जी. स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू व सहकारी सर्व पालकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम