लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

लासूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात संपन्न
लासुर | ता. चोपडा प्रतिनिधी

राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील नागरिकांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन लासुर येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. प्रा. आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत विविध योजनांचे लाभ व धनादेशांचे वाटप केले.

शिबिरात ११०० ते १२०० नागरिकांनी सहभाग घेत, महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज वितरण, सामाजिक न्याय आदी विभागांच्या योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध खात्यांनी एकत्र येऊन सेवा दिल्याने ग्रामीण जनतेला गावातच शासकीय सेवांचा लाभ सहज मिळाला.

माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, ए. के. गंभीर सर, देवीलाल बाविस्कर, कैलास बाविस्कर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अनिल विसावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विरेंद्र राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे, महावितरणचे अभियंता राजपूत, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे राजेश मोरे, तसेच किशोर महाजन, सुरेश महाजन, आबा बाविस्कर, वासुदेव महाजन, जितेंद्र महाजन, राहुल पाटील, युसुफ खाटीक, कल्पेश माळी, मुस्ताक पठाण, नौमील मिस्तरी, नारायण बागुल, पिताराम पावरा, रामचंद्र पावरा, शहारुख खाटीक, इत्यादी मान्यवरांसह तालुका व मंडळस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा) यांनी केले.

या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासकीय सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासनाविषयी जनतेत सकारात्मक भावना निर्माण झाली असून, अशा शिबिरांची अधिक गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम