
लिंगसमभाव प्रत्येक व्यक्तीत निर्माण होणे काळाची गरज -प्रा. डॉ. नीता जाधव यांचे प्रतिपादन
लिंगसमभाव प्रत्येक व्यक्तीत निर्माण होणे काळाची गरज -प्रा. डॉ. नीता जाधव यांचे प्रतिपादन
जळगाव. ;- डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथील इंग्रजी विभागाच्या वतीने आज ‘लिंगसमभाव व संवेदनशीलता’ या विषयावर डॉ. नीता जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात विचार मांडत असताना डॉ. नीता जाधव यांनी जेंडर इक्वलिटी, इक्विटी, सेंसिटायझेशन आणि सेंसिटीव्हिटी या संकल्पना विस्तृतपणे विशद केल्या. विविध क्षेत्रांशी निगडीत मार्मिक उदाहरणांसह त्यांनी जेंडर (लिंग) या शब्दाचा सापेक्ष अर्थ उलगडून सांगितला. समाजाने किंवा व्यवस्थेने स्त्रियांना हेतू पुरस्सर कसे दुय्यम स्थान दिले आहे हे स्पष्ट करताना त्यांनी जेंडर या संकल्पनेचा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ उलगडला. यासह समाज, प्रसारमाध्यमे यांनी स्त्रियांची पारंपारिक स्टेरियोटाइप ओंगळ प्रतिमा प्रसारित करणे थांबवावे. स्त्रियांनीही तसल्या प्रतिमा स्वीकारू नयेत व बीभत्स अश्या जाहिरातींतून स्वतःची प्रतिमा मलीन होऊ देऊ नये. याची काळजी घ्यावी. बायोलोजीकली जरी स्त्री हि पुरुषापेक्षा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसली तरी इन्तेलेक्तुअलि ती समान पातळीवर अनेक क्षेत्रात सिध्द झालेली आहे. जेंडर इक्विटी साध्य करायचे असेल तर विद्यार्थिनींनी त्यांच्या विद्यार्थी दशेपासून विशिष्ट ध्येय ठरवणे, त्याचा मागोवा घेणे, स्वतःला सिद्ध करणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे. हा एक उपयुक्त मार्ग आहे. हे सोदाहरण स्पष्ट केले. स्त्रीया शिक्षित होऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तर त्या स्वतःच्या न्याय व हक्कांसाठी बंडाचा मार्ग अवलंबन्याऐवजी समन्वयातून समाजात लिंगभाव समानता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका निभवू शकतात. त्यासाठी स्त्रियांनी स्वतः आपल्या स्वतःच्या तसेच कौटुंबिक आणि सामाजिक पर्यायाने राष्ट्राच्या चारित्र्याचा सांभाळ केला पाहिजे व स्रि-पुरुष समता जोपासून समाजीक आरोग्य आनंददायी होईल आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्थपणे हातभार लागेल असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी स्रियांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतः पुढे आले पाहिजे. त्यासाठी त्यांना शिक्षण घेऊन आर्थिक स्वावलंबनसह सिद्ध व्हावे लागेल. असे प्रतिपादन केले. आपल्या मनोगतात सरांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनी, महिलांसाठी केलेल्या सामाजिक सुधारणा चळवळी तसेच संवैधानिक कायदे यांचा दाखला दिला. आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून त्यांनी मुलींना स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःच आता पुढे आले पाहिजे असे आवाहन केले व प्रेरणा दिली. सूत्रसंचालन प्रा. योगिता सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्रजी विभागातील प्रा. सुनील अहिरे, प्रा. मिताली अहिरे, प्रा. नयना पाटील व प्रा. अमृता नेतकर यांनी परिश्रम घेतले. व्याख्यानासाठी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम