
लिग्रॅन्ड कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी आणि मोबाईलची चोरी
लिग्रॅन्ड कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी आणि मोबाईलची चोरी
जळगाव प्रतिनिधी – शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या लिग्रॅन्ड कंपनीच्या पार्किंगमधून एका कर्मचाऱ्याची दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, या चोरीमुळे कंपनीत आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव अनिल पाटील (वय २१, रा. वाटीका आश्रम) हे दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास लिग्रॅन्ड कंपनीत कामानिमित्त आले होते. त्यांनी आपली दुचाकी (क्रमांक MH 19 DC 1352) पार्किंगमध्ये उभी केली होती. काही वेळानंतर परत येऊन पाहिले असता दुचाकी तसेच कंपनीचा आयफोन मोबाईल (किंमत सुमारे २० हजार रुपये) गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुचाकीची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असून, दोन्ही वस्तू मिळून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश शिरसाळे हे करीत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम