लेवा पाटीदार प्रीमियर लीग अंतर्गत महिला आणि पुरुष बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

बातमी शेअर करा...

लेवा पाटीदार प्रीमियर लीग अंतर्गत महिला आणि पुरुष बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

महिलांच्या सहभागाने स्पर्धेत रंगत

जळगाव (प्रतिनिधी): लेवा पाटीदार प्रीमियर लीगच्या अंतर्गत “कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग” आणि “भारत रत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग” या स्पर्धांचे आयोजन २८ ते ३० मार्च २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे भव्य उद्घाटन पार पडले.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार, २९ मार्च रोजी या स्पर्धेच्या ब्रँड अँबेसिडर तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन खेळाडू महिलांचा उत्साह वाढवला. महिलांच्या बॉक्स क्रिकेट लीगला पहिल्यांदाच मिळालेल्या प्रतिसादामुळे सर्वच खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण होते.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात आ. राजू मामा भोळे, महादेव हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, माजी महापौर सीमा भोळे, सिंधुताई कोल्हे, उज्वलाताई बेंडाळे, मनीषा खडके (भुसावळ), गायत्री राणे, स्वाती भोळे (भुसावळ), आशाताई कोल्हे, स्वप्नाली काळे, डॉ. शिल्पा बेंडाळे, माधुरी अत्तरदे, सारिका फालक (भुसावळ), मेघा कुरकुरे (भुसावळ), जान्हवी पाटील, राधा कोल्हे, दीप्ती ढाके, हर्षाली चौधरी, गायत्री चौधरी, भावना धांडे, सारिका चौधरी, गायत्री महाजन, सुचिता चौधरी, डॉ. रती महाजन, विद्या बेंडाळे, डॉ. पूजा महाजन, कामिनी धांडे, एस. एस. पाटील, खुशबू राणे, युवराज रडे, मधुकर भंगाळे, अमित काळे, डॉ. वैभव पाटील, निलेश चौधरी, चंदन कोल्हे, चेतन पाटील, डॉ. पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते टॉस होऊन महिलांची बॉक्स क्रिकेट मॅच सुरू झाली.

या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ तसेच उत्तेजनार्थ स्मृतीचिन्हे देण्यात येणार आहेत. महिलांसाठी प्रथमच अशा प्रकारची बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आल्यामुळे सहभागी महिलांचा उत्साह लक्षणीय होता.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी गोदावरी फाऊंडेशन संचालित महादेव हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, एस. व्ही. पी. एल. सोलरचे संचालक हिमांशू इंगळे, डॉ. पंकज पाटील, डॉ. मनीष चौधरी, डॉ. जितेंद्र ढाके, महेश चौधरी, दीपक पाटील, चेतन पाटील, सौ. दीप्ती ढाके, जयेश नारखेडे, डॉ. वैभव पाटील, सोहम खडके, भूषण चौधरी, गौतम चौधरी, डॉ. गौरव महाजन, निलेश चौधरी, हरीश कोल्हे, आशुतोष पाटील, तेजस रडे, योगेश खडके, जयेश भंगाळे, माधुरी अत्तरदे, सुचिता चौधरी, प्रीती महाजन, राधा कोल्हे, गायत्री राणे, पल्लवी चौधरी, पूजा महाजन, शर्वरी काळे, गायत्री महाजन, पूजा सरोदे, अमिता भंगाळे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. संघटनांच्या पाठिंब्यामुळे आणि समाजातील भगिनींच्या सहकार्याने महिलांना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल सहभागी खेळाडूंनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम