लोकतंत्र सेनानी संघाच्या प्रांतस्तरीय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा...

लोकतंत्र सेनानी संघाच्या प्रांतस्तरीय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्र्यांच्या आभाराचा ठराव एकमताने मंजूर

जळगाव, २८ जून (प्रतिनिधी) – आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दादर येथील वसंतस्मृती सभागृहात लोकतंत्र सेनानी संघाचा प्रांतस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज्यभरातून आलेल्या ३२४ लोकतंत्र सेनानींनी सहभाग घेतला. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव करत आभाराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या मेळाव्यात अखिल भारतीय सचिव कोमल छेडा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. संघटनेचे प्रांताध्यक्ष उमेकर, कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी आणि सचिव प्रदीप ओगले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कोमल छेडा, उमेकर आणि रघुनाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनानंतर विश्वास कुलकर्णी यांनी संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच उपस्थित सेनानींच्या शंकांना उत्तर देत समाधानकारक चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी निधीत दुप्पट वाढ करणे व जिल्हास्तरीय सत्कार समारंभांचे आयोजन करणे या योगदानाबद्दल आभाराचा ठराव विश्वास कुलकर्णी यांनी मांडला, जो एकमताने संमत झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप ओगले यांनी केले, तर आभारप्रदर्शन विश्वास कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम्’ने झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम