लोकशाही सप्ताह २०२५ निमित्त तीन दिवसीय युवा संसद कार्यशाळेचे आयोजन
कार्यशाळेचे उदघाटन
लोकशाही सप्ताह २०२५ निमित्त तीन दिवसीय युवा संसद कार्यशाळेचे आयोजन
कार्यशाळेचे उदघाटन
जळगाव प्रतिनिधी
-लोकशाही सप्ताह २०२५ निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळा अंतर्गत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय युवा संसद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रशाळेचे संचालक डॉ. अजय पाटील होते. सदर कार्यशाळेसाठी जळगाव , धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण १६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. साधन व्यक्ती म्हणून डॉ. संदीप नेरकर व डॉ. सुनिल नेवे यांची तर साधन व्यक्ती व तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून डॉ. राजीव पवार, डॉ. वकार शेख, डॉ. संतोष खात्री आणि डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत साधन व्यक्ती तसेच तज्ज्ञ प्रशिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणाली बद्दल प्रशिक्षण देखील देण्यात आले. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांची अभिरूप संसद भरवण्यात आली. या अभिरूप संसदेसाठी सहभागी विद्यार्थ्यांमधून वेगवेगळे मंत्री, सभापती तसेच खासदार म्हणून निवडण्यात आले.
या कार्यशाळेचा समारोप विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यशाळेत जॅकी वासवानी व सबा चौधरी यांची उत्कृष्ठ युवा संसदपटू तर आदित्य बिऱ्हाडे, यशोदीप काशिनाथ पाटील आणि अक्षय जाधव यांची उत्तेजनार्थ युवा संसदपटू म्हणून निवड करण्यात आली. सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून मोईन शेख यांनी काम पाहिले. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनोज इंगोले, प्रा. प्रदीप गोफणे, प्रा. रोशन मावळे आदींनी मेहनत घेतली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम