लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे अभिवादन

बातमी शेअर करा...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे अभिवादन

नेरी नाका चौकात पुतळ्यास माल्यार्पण; मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली

जळगाव : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त नेरी नाका चौक येथे त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

दलित, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या संघर्षमय जीवनाचे यथार्थ दर्शन आपल्या साहित्याच्या माध्यमातून घडवणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला होता. त्यांनी आयुष्यभर सामाजिक परिवर्तनासाठी लेखणीचा प्रभावी वापर केला. त्यांच्या लेखनातून अन्यायाविरोधातील लढा आणि स्वाभिमानाची जाणीव सतत जागवली गेली.

या कार्यक्रमास फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, ज्येष्ठ समाजसेवक विजय दहियेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, उमेश माछरेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, पंकज गागडे, संदीप बागडे, राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे, कमल गागडे आदी मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची उजळणी करत, समाजप्रबोधन आणि संघटनात्मक बांधिलकीचा संदेशही देण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम