
लोक अदालतीत चोपडा पालिकेची ३७ लाख ५१ हजार ९५१ रुपये थकीत वसुली
लोक अदालतीत चोपडा पालिकेची ३७ लाख ५१ हजार ९५१ रुपये थकीत वसुली
चोपडा : दिवाणी व फौजदारी न्यायालय व चोपडा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीत २९ प्रकरणांमधून तडजोडीद्वारे तब्बल ३७ लाख ५१ हजार ९५१ रुपये थकीत वसूल करण्यात आले.
या प्रक्रियेत मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मिळकत व्यवस्थापक संजय धमाळ आदी अधिकारी उपस्थित होते. गाळेधारकांनी सूट व तडजोडीबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, २५ सप्टेंबरला नगरपरिषदेच्या नाट्यगृहात लोकसेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे उपस्थित राहणार आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम