लोखंडी कठड्यांमुळे दुचाकीस्वार जखमी, पाय फ्रॅक्चर

बातमी शेअर करा...

लोखंडी कठड्यांमुळे दुचाकीस्वार जखमी, पाय फ्रॅक्चर

 अंकलेश्वर–बुरहानपूर मार्गावरील बेफिकीर बसावणीवर वाहनचालक संतप्त

चोपडा प्रतिनिधी

अंकलेश्वर–बुरहानपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला अवघ्या काही फुटांवर बसवलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्यांमुळे पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून एका दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाल्याने वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. चुकीच्या ठिकाणी व अति जवळ बसवलेल्या कठड्यांमुळे या मार्गावरील अपघातांची मालिका वाढत असल्याची गंभीर परिस्थिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एम.पी. ४६ झेडएच ५६३ क्रमांकाची दुचाकी चोपड्याकडून अडावदकडे जात असताना रस्त्याच्या बिलकूल कडेला बसवलेला लोखंडी कठडा समोर येताच दुचाकी त्यावर आदळली. धडक प्रचंड असल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला व त्याचा पाय तडकला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळी उपस्थित युवा शेतकरी शरद महाजन, शामकुमार महाजन, जितेंद्र महाजन, रिंकू महाजन आणि सचिन महाजन यांनी पुढाकार घेत तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावली तसेच अडावद पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनीही त्वरित धाव घेत जखमीला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम