लोणसीम येथे बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला
मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
लोणसीम येथे बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला
मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर I प्रतिनिधी
लोणसीम येथील ३५ वर्षीय तरुण हा १५ जानेवारीपासून बेपत्ता झाला होता . त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने परीसारत खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील लोण सिम येथे राहणारा प्रमोद शांताराम बोरसे (वय ३५) हा तरुण दि.१५ रोजी दुपारी १२ वाजता शेतात जाऊन येतो, असे सांगून निघून गेला मात्र तो उशिरापर्यंत न आल्याने नातेवाईकांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. दि.१६ रोजी दुपारी त्याची चप्पल भिकूबाई शांताराम बोरसे यांच्या शेतात विहिरी जवळ आढळून आली. विहिरीत उतरून गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास विनोद साळी हे करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम