
वंचित बहुजन आघाडीत फेरबदल; जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांचा राजीनामा मंजूर
वंचित बहुजन आघाडीत फेरबदल; जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांचा राजीनामा मंजूर
जळगाव (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीचा आढावा १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. या बैठकीत जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी दिलेला राजीनामा पक्षाने मंजूर केला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व तालुका व शहर कार्यकारिण्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवीन कार्यकारिण्या गठित करण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात येत असून, आजी-माजी पदाधिकारी तसेच जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔹 मुलाखतीचे स्थळ : अजंठा गेस्ट हाऊस, जळगाव खान्देश
🔹 दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
🔹 वेळ : सकाळी १० वा.
ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच जळगाव जिल्हा समन्वयक अशोक सोनोने यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम