
वंदे मातरम गीताच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम
वंदे मातरम गीताच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम
जळगाव, प्रतिनिधी : “वंदे मातरम” गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देशभक्तीच्या उत्साहाने नटलेला विविध नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठ परिसर देशप्रेमाने दुमदुमून गेला असताना विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीचा जाज्वल्य भाव चेतवला.
कार्यक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी, कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापकीय परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, सदस्य शिवाजी पाटील, नितीन झाल्टे, प्रा. जगदीश पाटील, प्रा. पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, राजभवन निरीक्षण समितीचे अध्यक्ष संदीप हांडोळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी प्रभाकर कला अकादमी, कलादर्पण फाउंडेशन, मुद्रा भरत नाट्यम स्कूल ऑफ आर्ट आणि विवेकानंद प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारी देशभक्तीपर नृत्ये सादर केली. त्याचप्रमाणे विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत विभागाने मनाला स्पर्श करणारे देशभक्तीपर गायन सादर केले. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करत कार्यक्रमाला भावपूर्ण स्वरुप दिले.
कार्यक्रमास अधिसभा सदस्य नेहा जोशी, स्वप्नाली महाजन, मिनाक्षी निकम, वैशाली वराडे, धीरज वैष्णव, संजय हांडे, डॉ. महिमा मिश्रा आणि डॉ. अपर्णा भट उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय सुबळे यांनी प्रभावीपणे पार पाडले.
देशभक्तीचा आविष्कार आणि संस्कृतीचे संगम घडविणारा हा सोहळा विद्यापीठाच्या इतिहासात संस्मरणीय ठरला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम